तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्ट बोटमध्ये बिघाड, पाळंदे किनाऱ्यावर अचानक बोट आल्याने पसरली घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 13:14 IST2022-04-28T13:06:39+5:302022-04-28T13:14:02+5:30
दापोली : बिघडलेली एक बोट दापोलीनजीकच्या पाळंदे किनाऱ्यावर आणली जाणार असल्याची चर्चा होती आणि अचानक एक हॉवरक्राफ्ट बोट किनाऱ्यावर ...

तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्ट बोटमध्ये बिघाड, पाळंदे किनाऱ्यावर अचानक बोट आल्याने पसरली घबराट
दापोली : बिघडलेली एक बोट दापोलीनजीकच्या पाळंदे किनाऱ्यावर आणली जाणार असल्याची चर्चा होती आणि अचानक एक हॉवरक्राफ्ट बोट किनाऱ्यावर आली. बरेच बघे तिथे जमले. काही काळ घबराट पसरली होती. मात्र ही बोट तटरक्षक दलाची असल्याचे निष्पन्न झाले आणि साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
समुद्रात बिघडलेली एक बोट पाळंदे किनाऱ्यावर आणली जाणार असल्याची चर्चा गावात सुरू होती. पण, प्रत्यक्षात एक हॉवरक्राफ्ट तेथे आले. त्यामुळे लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. दरम्यान, ते तटरक्षक दलाचे आहे हे कळल्यानंतर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. आसपासच्या गावांतील लोकही ते पाहण्यासाठी गोळा झाले.
तांत्रिक बिघाड झाल्याने हे हॉवरक्राफ्ट किनाऱ्यावर उभे करून ठेवण्यात आले आहे. झाल्यानंतर ते येथून रवाना होणार दुरुस्ती आहे. मात्र, अचानक ही बोट किनाऱ्यावर आल्याने पाळंदे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती.