शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

कळंबस्तेतील रेल्वे फाटकामुळे तब्बल चार तास रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 2:03 PM

यावेळी चिरणीमार्गे कळंबस्तेहून काही वाहने सोडण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी या रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे उड्डाण पुलाचे अंदाजपत्रक धूळखात- पंधरागाव विभागातील ग्रामस्थांचे दिवसातील चार तास जातात रेल्वे फाटकावर प्रतीक्षा करण्यात

चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर दिवसातून ६० फेऱ्या होत असल्याने तालुक्यातील कळंबस्ते येथील रेल्वे फाटक सुमारे चार तास बंद करावे लागते. पंधरागाव विभागातील ग्रामस्थांचा हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी ३६ कोटीचे तयार केलेले अंदाजपत्रकही धूळखात पडले आहे.तालुक्यातील कळंबस्ते येथे मुख्य रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. या मार्गावरून नवी कोळकेवाडी, मोरवणे, दळवटणे, निरबाडे, खांदाटपाली तसेच खेड तालुक्यातील काडवली, धामणंद, मुसाड, भिलसई, चोरवणे, चिरणी, आंबडस हा भाग पंधरागाव नावाने सर्वदूर परिचित आहे. हजारोंच्या संख्येने या गावांमध्ये लोकवस्ती असून, चिपळुणात ये-जा करण्यासाठी कळंबस्ते हा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील रहदारीचे प्रमाणही आता वाढले आहे. एखाद्या वेळी रेल्वे फाटक पडले असल्यास वाहनांची लांबच-लांब रांग लागते. त्यातच आता रेल्वे मार्गावर जादा व रो-रो स्वरूपाच्या गाड्यांचे प्रमाण वाढले असल्याने दिवसातून अनेकदा रेल्वे फाटक बंद करावे लागते. अशा वेळी रुग्ण असो अथवा अन्य कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास येथे ग्रामस्थांपुढे कोणताही पर्याय राहात नाही. त्यामुळे हा प्रश्न ग्रामस्थांसाठी डोकेदुखी झाला आहे.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत महामार्गावरील अवजड वाहने परशुराम मार्गे सोडता येणे अशक्य होणार आहे. यावेळी चिरणीमार्गे कळंबस्तेहून काही वाहने सोडण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी या रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही सुरू आहे. मात्र, तसे झाल्यास कळंबस्ते रेल्वे फाटकाजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

  • अनेक वर्ष पत्रव्यवहार

पंधरागावमधील ग्रामस्थांकडून याविषयीचा वेळोवेळी पत्रव्यहार करण्यात आला आहे. त्यानुसार येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय झाला आहे. या उड्डाणपुलासाठी ३६ कोटींचे अंदाजपत्रक तयार आहे. कोकण रेल्वे व राज्य शासन यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्के  उपलब्ध करण्यात येणार आहे. रेल्वेने या निधीची तूरतूद केली आहे. मात्र उर्वरित निधीचा प्रश्न कायम असल्याने प्रस्ताव बारगळला आहे. 

कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल असल्याने त्याचा थेट फायदा कोकण रेल्वेला होणार आहे. त्यामुळे या पुलासाठी शंभर टक्के निधी कोकण रेल्वेनेच उभा करावा. तरच हा प्रश्ना सुटेल. तत्कालिन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी याबाबत चर्चा होऊन त्यांनी ते मान्यही केले होते. मात्र, पुढे कार्यवाही झाली नाही.- शौकत मुकादम, कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे