शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 17:16 IST

२००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्दे - २१ पॅरा कमांडो विशेष दलाचा वर्धापनदिन - शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान

संजय सुर्वे।शिरगाव : सैन्य दलातील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आलेले प्रसंग व त्या परिस्थितीत कुटुंबियांकडून मिळालेली अजोड साथ या सर्व आठवणींना उजाळा देत देशाच्या कानाकोपºयात कार्यरत असलेले आजी-माजी सैनिकांचे सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबीय या आकस्मिक भेटीने सुखाहून गेले. २१ पॅरा कमांडो विशेष दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते.चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात २१ पॅरा कमांडो विशेष दलाचा ३४वा वर्धापन दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देशभरातून आलेल्या सैनिक कुटुंबियांनी शहिदांना आदरांजली वाहत कार्यक्रमाची सुरुवात केली. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री, शौर्यचक्रप्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे, विकलांग सैनिक शामराज युवी, सुभेदार मधुकर पाटील, शहीद सैनिक सुधाकर भाट यांच्या पत्नी, १९७१चे वीरचक्रप्राप्त व चिपळूणचे कॅप्टन अर्जुन जाधव यांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.श्यामराज युवी यांची अनोखी झुंज...कमरेच्या खाली विकलांग असलेले पॅरा कमांडो श्यामराज युवी यांचा जीवनप्रवास अंगावर २००२मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’वेळी बर्फाळ टेकडीवर कर्तव्य बजावताना त्यांची गाडी दरीत कोसळली व ते बाहेर फेकले गेले. झाडात अडकले मात्र कमरेखालील भागाच्या संवेदना गेल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या पुढील आयुष्याची चिंता सर्वांनाच वाटत होती. २००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी तत्कालिन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आपला जीवनप्रवास खडतर असला तरी सैनिक परिवारातच सुख मानणारे श्यामराज कुठेही कार्यक्रम असला तरी हजेरी लावतात. याबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले.‘लोकमत’च्या वृत्तानंतर घेतली सत्कारमूर्तींची भेटराज्यातील वीरमाता, पत्नी चिपळुणात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त वाचून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निर्मला जाधव, मालती पवार, सीमा चाळके, अंजली कदम, दीप्ती सावंत-देसाई, जिजाऊ स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष महेंद्र पालांडे, सांजसोबत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा बेलोसे-कदम यांनी सर्व सत्कारमूर्तींची भेट घेऊन सन्मानित केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी