शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

चिपळुणात एसटी बसला अपघात, दैव बलवत्तर म्हणून सर्व बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 7:13 PM

पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले.

ठळक मुद्देचिपळुणात एसटी बसला अपघातदैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले

चिपळूण : पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले.येथील आगारातून चिपळूण-शिल्डी ही बस पहाटे पाच वाजता सोडण्यात आली. त्यानंरत शिल्डी येथे प्रवाशांना सोडून ही बस चिपळूणकडे येत असताना भेलसई येथे एका अवघड वळणावर हा अपघात घडला.

सकाळच्या धुक्यातून काही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने बसवर नियंत्रण आणताना बसच्या पुढील चाक रस्त्याबाहेर गेले आणि नजीकच्या एका वृक्षाला बस जाऊन टेकली. या वृक्षाच्या पलिकडे दरीचा भाग होता व तेथेच नदीही होती. त्यामुळे वृक्ष नसता तर ही बस थेट नदीत कोसळली असती.या घटनेची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी मॅकेनिक व अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना मदत केली. तसेच घसरलेली बसही क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.जखमी कोणी नाही- राजेशिर्केया घटनेबाबत आगार व्यवस्थापक राजेशिर्के यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच बसही सुखरूपने बाहेर काढण्यात आली असून फारसे नुकसान झालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी