शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

चिपळूणच्या स्वच्छतेचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर झाला ओंकार भोजने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:28 IST

अभिनय क्षेत्रात पाडली स्वतःची छाप

चिपळूण : ‘स्वच्छ भारत मिशन - शहरी’अंतर्गत चिपळूण नगरपरिषदेने सामाजिक भान जपणाऱ्या आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची छाप पाडलेल्या अभिनेते ओंकार भोजने यांची स्वच्छतादूत (ब्रॅण्ड ॲम्बेसेडर) म्हणून नियुक्ती केली आहे.नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी भोजने यांना नियुक्तिपत्र देताना सांगितले की, चिपळूण शहरात स्वच्छताविषयक जनजागृती करण्यासाठी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींचा सहभाग अत्यावश्यक आहे. ओंकार भोजने हे युवा, तरुण तसेच वृद्धांचेही आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे स्वच्छता मोहिमेला नवी दिशा व ऊर्जा मिळेल.मूळचे चिपळूणचेच असलेल्या ओंकार भोजने यांनी छोट्या पडद्यावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. विनोदी अभिनेता म्हणून स्वत:ला वेगळी ओळख मिळवली आहे. अल्पकाळातच त्याचा चाहता वर्ग वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या सहभागातून लोकसहभाग वाढवून चिपळूण शहर अधिक स्वच्छ आणि अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.शहरात लवकरच स्वच्छतेसाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून, त्यात ओंकार भोजने सक्रिय सहभाग घेणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मोहिमेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून, आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चिपळूणकरांसोबत हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी मी पूर्ण योगदान देईन. - ओंकार भोजने, अभिनेता, चिपळूण