रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 15:56 IST2021-12-01T15:55:42+5:302021-12-01T15:56:15+5:30

२१ पैकी १९ जागा जिंकून डॉ. चोरगे यांच्या सहकार पॅनेलने बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे.

As the Chairman of Ratnagiri District Central Bank Dr. Tanajirao Chorge | रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डॉ.तानाजीराव चोरगे व उपाध्यक्षपदी बाबाजी जाधव यांची निवड झाली आहे. २१ पैकी १९ जागा जिंकून डॉ. चोरगे यांच्या सहकार पॅनेलने बँकेवर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे.

बँकेच्या सभागृहात सहकारचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता. प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे डॉ. सोपान शिंदे यांनी जाहीर केले.

उपस्थित संचालक, बँकेचे कार्यकारी संचालक सुनिल गुरव, सरव्यवस्थापक अजय चव्हाण, सुधीर गिम्हवणेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश कीर, को-ऑपरेटीव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, कर्मचारीनेते सुधाकर सावंत आदींनी डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

Web Title: As the Chairman of Ratnagiri District Central Bank Dr. Tanajirao Chorge