सभागृहाला श्रेयवादाचा फटका
By Admin | Updated: January 8, 2016 00:04 IST2016-01-08T00:04:15+5:302016-01-08T00:04:15+5:30
नानी - नानी पार्क स्वप्नच : ४७ लाखांचा निधी मिळूनही मुदतीनंतर काम रखडलेले

सभागृहाला श्रेयवादाचा फटका
जिल्ह्यात साडेसहा लाख पशुधन : प्रतिमाह एक लाख मे. टन चाऱ्याची गरज
अमरावती : जिल्ह्यात पशुधनासाठी प्रतिमाह सरासरी १ लाख ४ हजार ६०६ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. यंदाच्या खरीप व रबी हंगामाच्या पेरेपत्रकानुसार व अन्य मार्गाने उपलब्ध होणारा चारा ६ लाख ६९ हजार ५५९ मेट्रिक टन असल्याने हा चारा गुरांना केवळ ८ महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे यंदा जानेवारी अखेरनंतर जिल्ह्यात वैरणटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमरावती जिल्ह्यात १९ व्या पशुगणनेनुसार गाय व म्हैसवर्गीय लहान जनावरांची संख्या १ लाख ३८ हजार १६८ इतकी व मोठ्या गुरांची संख्या ५ लाख १२ हजार ६ अशी एकूण ६ लाख ५० हजार २२८ इतकी आहे.
या पशुधनासाठी सन २०१५-१६ वर्षामध्ये या पशुधनासाठी प्रतिमाह १ लाख ४ हजार ६०६ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील चारा जानेवारीपर्यंत पुरणार असल्याने नंतरच्या काळात चाराटंचाई सदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारा कामधेनू योजना तसेच जिल्हा विकास निधीतून वैरण बियाणे वाटप कार्यक्रम तसेच निकृष्ट चारा सकस करण्याबाबत प्रात्याक्षिक देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०४ हायड्रोपोनिक संच निर्मित करुन हिरवी वैरण उपलब्ध करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
मोठ्या जनावरांमध्ये (गाय/म्हैस) प्रतिदिन १५ किलोग्रॅम हिरवा चारा किंवा ६ किलोग्रॅम वाळला चारा व ३५ ते ४० लिटर पाण्याची आवश्यकता असते. लहान जनावरांना हिरवा चारा ७.५ किलोग्रॅम किंवा वाळलेल्या ३ किलो चाऱ्याची व १० ते १५ लिटर पाण्याची आवश्यकता असते. वेळीच नियोजन न झाल्यास जिल्ह्यातील पशुधनाला वैरणटंचाई भेडसावणार आहे. हे धोक्याचे संकेत मिळाले आहेत.
जून २०१६ पर्यंत ७ लाख
३२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची गरज
जिल्ह्यातील ६,५०,२२८ पशुधनासाठी दरदिवशी ३,४८७ मे.टन चाऱ्याची गरज आहे. यंदा १,५९,६३३ मे.टन अपेक्षित चारा उत्पादन होण्याची शक्यता आहे. वनजमीन, गायरान व पडिक जमिनीद्वारे ४७,२२० मे. टन चारा असा एकूण ८,२९,१९७ मे. टन इतका चारा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील पशुधनाला दरमहा १०४,६०६ इतका चारा लागतो. जानेवारी ते जून २०१६ पर्यंत ७,३२,२४२ मे.टन इतका चारा आहे. मात्र, जिल्ह्यात उपलब्ध असणारा चारा हा ८ महिने पुरेल इतका असल्याने अन्य ४ महिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.