देवरूख-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे टायरच निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:17 IST2019-06-22T17:16:56+5:302019-06-22T17:17:47+5:30
प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे मागील टायर निखळून अपघात झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे - घोडवली घाटात घडली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे येथील मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमाराला ही घटना घडली.

देवरूख-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या गाडीचे टायरच निखळले
देवरूख : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे मागील टायर निखळून अपघात झाल्याची घटना देवरूख-रत्नागिरी मार्गावर वायंगणे - घोडवली घाटात घडली. एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे येथील मोठा अनर्थ टळला. शनिवारी दुपारी १२.४५ च्या सुमाराला ही घटना घडली.
रत्नागिरी आगारातून देवरूखकडे जाणारी एमएच ४०, एन ९२०३ ही एसटी घोडवली-वायंगणे घाट उतरत असताना वायंगणेच्या अलीकडे या धावत्या गाडीचे मागचे २ टायर निखळले. एसटीच्या गतीवरून चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी थांबवली.
यामुळे मोठी दुर्घटना टळली. आहे त्याच गतीने जर का चालक गाडी घेऊन पुढे आला असता तर वायंगणे येथील वळणावर मोठा अपघात घडला असता. गाडीचे दोन्ही टायर पूर्णत: बाहेर पडले असते. परंतु चालकाने वेळीच गाडी आवरल्याने अनर्थ टळला.
देवरूख आगाराच्या कारभाराचा गेल्या काही महिन्यांपासून बोजवारा उडाला आहे. गाड्या वेळेत न सुटणे, गाड्या सुस्थितीत नसणे, प्रवाशांच्या समस्या वेळेत न सोडवणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. या कारभारावर योग्य नियंत्रण नसल्याने देवरूख डेपोचा कारभार ढिसाळ झाल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.