देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात
By अरुण आडिवरेकर | Updated: April 15, 2024 18:00 IST2024-04-15T17:59:34+5:302024-04-15T18:00:07+5:30
गणपतीपुळे : देवदर्शन करुन परतत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सांगाेला (जि. साेलापूर) येथील कुटुंबाच्या गाडीला अपघात ...

देवदर्शनासाठी आलेल्या सांगाेल्यातील गाडीला गणपतीपुळेत अपघात
गणपतीपुळे : देवदर्शन करुन परतत असताना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सांगाेला (जि. साेलापूर) येथील कुटुंबाच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात रविवारी दुपारी गणपतीपुळे ते निवळी मार्गावरील ओरी येथे झाला. सुदैवाने या अपघातात काेणी जखमी झाले नसून दाेन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
याबाबत चंद्रकांत अंकुश केदार (२७) यांनी फिर्याद दिली आहे. ते चारचाकी (एमएच १३, डीवाय ८६१७) गाडी घेऊन रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले हाेते. देवदर्शन करुन ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सांगाेला येथे जाण्यासाठी निघाले. गणपतीपुळे ते निवळी या रस्त्यावरून गाडी घेऊन जात असताना ओरी गावाच्या सीमेवरील एका वळणावर समाेरुन येणाऱ्या दुसऱ्या चारचाकी (एमएच १०, ईए ८५०६) गाडीने धडक दिली. ही गाडी अशाेक नायकवडी (रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) चालवित हाेते. त्यांनी चंद्रकांत केदार यांच्या गाडीच्या उजव्या बाजूला धडक देत अपघात केला. या अपघातात काेणी जखमी झाले नसून, दाेन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
या अपघाताची रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे. चंद्रकांत केदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाेलिसांनी अशाेक नायकवडी यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकाचे पाेलिस करत आहेत.