शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

चालकाला डुलकी आल्याने बस उलटली, सिंधुदुर्गातील आठ प्रवासी जखमी; संगमेश्वर येथील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:52 IST

जखमी सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते

देवरुख (जि.रत्नागिरी) : चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातातसिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते. हा अपघात शनिवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे झाला. या अपघातप्रकरणी चालक राजेंद्र उखा वाघ यांच्यावर संगमेश्वर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातप्रकरणी कैलास अशाेक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सुधीर सदाशिव मसूरकर (४०), प्रमिला सुधीर मसूरकर (३२), वीर सुधीर मसूरकर (१०), कार्वी सुधीर मसुरकर (५), प्रिया प्रकाश राणे (५१), वैभव प्रकाश राणे (३०), प्रवीण शंकर सावंत (४९) आणि विद्या प्रवीण सावंत (४९, सर्व रा.कणकवली, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत.हे सर्वजण गणपतीसाठी गावाला येत हाेते. बसचालक राजेंद्र वाघ हे शनिवारी इगतपुरी येथून अंधेरी ते सावंतवाडी (एमएच १४, बीटी १७०८) ही गाडी घेऊन सिंधुदुर्गकडे जात हाेते. मुंबई-गाेवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे बस आली असता, चालक वाघ यांना डुलकी आली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात