दापोली आगारातून बोरिवली, नालासोपारा बस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:41+5:302021-05-31T04:23:41+5:30

दापोली : प्रवाशांच्या सेवेसाठी दापोली आगारातर्फे कोविड- १९ आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून बोरिवली, नालासोपारा या फेऱ्या २४ मेपासून ...

Borivali, Nalasopara bus starts from Dapoli depot | दापोली आगारातून बोरिवली, नालासोपारा बस सुरू

दापोली आगारातून बोरिवली, नालासोपारा बस सुरू

दापोली : प्रवाशांच्या सेवेसाठी दापोली आगारातर्फे कोविड- १९ आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून बोरिवली, नालासोपारा या फेऱ्या २४ मेपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागांमध्ये दाभोळ तसेच खेड, मंडणगड अशी बससेवा सुरू असल्याचे दापोलीच्या आगार व्यवस्थापिका रेश्मा मधाळे यांनी सांगितले.

आगारातर्फे रात्री १० वाजता दापोली- बोरिवली, रात्री १० वाजता बोरिवली- दापोली, रात्री ९.३० वाजता दापोली- नालासोपारा, सकाळी ८.३० वाजता नालासोपारा-दापोली या वेळेत गाड्या सोडण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधील आणि गरजू प्रवाशांनी या फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासन रत्नागिरी विभाग राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे. या फेऱ्या मुंबईकडे जाताना पनवेलपासून पुढे सर्व थांबे प्रवासी चढ-उतार करण्यासाठी थांबणार आहेत. तसेच परतीवर महाडपासून पुढे सर्व थांबे (लांबपल्ला) थांबतील. प्रवासावेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे, शासकीय आरोग्य विषयक सूचना पालन करणे आवश्यक आहे. प्रवासी प्रतिसाद लाभल्यास या फेऱ्या कायमस्वरूपी सुरू ठेवल्या जाणार आहेत. तसेच ग्रामीण भागात दाभोळ, खेड, मंडणगड, हर्णे या मार्गांवर ही बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच रोपवाटिका जांभा, आंबा आणि इतर साहित्याची मालवाहतूक दापोली आगारातर्फे सुरू असल्याचे आगार व्यवस्थापिका रेश्मा मधाळे यांनी केले आहे.

Web Title: Borivali, Nalasopara bus starts from Dapoli depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.