शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: चार ठिकाणी सेनेविरोधात भाजपचे बंड, बंडखोरी थोपविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:57 IST

रत्नागिरी जिल्ह्यात युती व आघाडी या दोन्हींमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून बंडाळी माजली आहे. दापोली, गुहागर, चिपळूण व राजापूर या मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून बंड केले आहे.

ठळक मुद्देचार ठिकाणी सेनेविरोधात भाजपचे बंड, बंडखोरी थोपविण्याचे आव्हानदापोली मतदारसंघात आघाडीतही बिघाडी, अर्ज माघारीपर्यंत प्रतीक्षा

प्रकाश वराडकर रत्नागिरी : जिल्ह्यात युती व आघाडी या दोन्हींमध्ये विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून बंडाळी माजली आहे. दापोली, गुहागर, चिपळूण व राजापूर या मतदारसंघात युतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात भाजपच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून बंड केले आहे.

दापोली मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कॉँग्रेसच्या दापोली व मंडणगड तालुकाध्यक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करून दंड थोपटले आहेत. महायुतीने बंडखोरांना कारवाईची भीती दाखवली आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत कितीजण माघार घेणार व कोण भूमिगत होणार, याची चर्चा रंगली आहे.राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ आॅक्टोबर २०१९ रोजी मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबरला निवडणूक मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. आता अवघे काही दिवस निवडणुकीला उरलेले असताना सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रचाराचे काम करणे म्हणजे रात्र थोडी सोंगे फार, या उक्तीप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. २०१४च्या निवडणुकीत युती तुटली होती. २०१९मध्ये सेना - भाजप युतीमध्ये उमेदवारीवरून असंतोष खदखदत असल्याने बंडखोरी झाली आहे. राज्यात बंडखोरांचा पक्षच स्थापन झाला आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी व राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघात युती म्हणून सर्वच जागांवर शिवसेनेला उमेदवारी मिळाली आहे. जिल्ह्यातील एकही मतदारसंघ भाजपच्या वाटणीला आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खदखद आहे, असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्ह्यातील ४ मतदारसंघात सेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे.दापोली मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम हे युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तेथून भाजपचे पदाधिकारी केदार साठे यांनी बंडखोरी केली आहे. गुहागर मतदारसंघात भाजपचे रामदास राणे यांनी युतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. चिपळूण मतदारसंघात युतीचे उमेदवार सदानंद चव्हाण यांच्याविरोधात बंडखोरी करीत भाजपचे तुषार खेतल यांनी अर्ज दाखल केला आहे. तर राजापूर मतदारसंघात युतीचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात भाजपचे संतोष गांगण यांनी बंडखोरी केली आहे.दापोली मतदारसंघात कॉँग्रेस आघाडीतही बंडाळी माजली आहे. राष्ट्रवादीचे संजय कदम हे आघाडीचे अधिकृत उमेदवार असताना त्यांच्या विरोधात कॉँग्रेसचे दापोली तालुका अध्यक्ष भाऊ मोहिते व मंडणगडचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर यांनी बंड करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघात सेनेतून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सहदेव बेटकर यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापतीपदाचा राजीनामा दिला व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे.

गुहागरचे आमदार म्हणून कार्यरत असलेले भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सेनेत प्रवेश केला होता. जाधव यांना सेनेची गुहागरची उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपचे विनय नातू व त्यांचे समर्थक यामुळे नाराज आहेत.दबाव येणारया मतदारसंघात सेनेचे योगेश रामदास कदम यांच्याविरोधात बविआने त्याच नावाचे योगेश दीपक कदम यांना उमेदवारी दिली आहे, तर या खेळीला उत्तर म्हणून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार संजय कदम यांच्या विरोधातही नाम साधर्म्य असलेले अपक्ष संजय कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. नाम साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती रिंगणात उतरविण्यात कोणाचा हात आहे, याची चर्चा आता सुरू आहे.बंडखोर होणार  नॉट रिचेबलउमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युती व आघाडीतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांची नाराजी शमविण्यात युती, आघाडीला यश येणार की माघार घेण्यासाठी दबाव येण्याच्या भीतीने बंडखोर नॉट रिचेबल होणार, याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ७ ऑक्टोबर या अखेरच्या दिवशीच बंडखोरीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस