फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:55 PM2020-11-14T16:55:13+5:302020-11-14T16:57:56+5:30

politics, Shiv Sena, Chiplun, Ratnagiri, Bhaskar Jadhav मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

Big loss due to Fadnavis government: Criticism of Bhaskar Jadhav | फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान : भास्कर जाधवचिपळुणातील शिवसेना मेळाव्यात भास्कर जाधव यांची टीका

चिपळूण : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

गुहागर मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील ७२ गावातील शिवसैनिकांचा मेळावा कोंढे रिगल सभागृह येथे गुरुवारी आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा खांडेकर, सभापती धनश्री शिंदे, अरुण चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शरद शिगवण, उपतालुकप्रमुख संभाजी खेडेकर उपस्थित होते.

यावेळी जाधव म्हणाले की, मला आता प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. कारण मी मतदारसंघ विकासकामावर उभा केला आहे. ज्या-ज्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला, त्या-त्यावेळी जनता माझ्याबरोबर राहिली. त्याचे कारणच हेच आहे की, मी कामानेच लोकांची मने जिंकली आहेत आणि माझ्यासमोर जो उभा राहिला तो परत कधी निवडून आला नाही आणि मतदार संघात पुन्हा दिसलाही नाही. भास्कर जाधव ६ वेळा जिंकून आला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शासनाच्या माध्यमातून १४ कोटी रुपये मतदार संघासाठी आणले आहेत. दिवाळीनंतर मतदार संघातील सर्व नळपाणी योजना मंजूर करून घेणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Big loss due to Fadnavis government: Criticism of Bhaskar Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.