भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST2021-04-15T04:29:46+5:302021-04-15T04:29:46+5:30

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावातील तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विनोद मिरगल यांच्या अथक प्रयत्नाने भालेकरवाडी ते धाकोंडी या ...

Bhumi Pujan of Bhalekarwadi to Dhakondi road work | भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

भालेकरवाडी ते धाकोंडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावातील तरुण उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विनोद मिरगल यांच्या अथक प्रयत्नाने भालेकरवाडी ते धाकोंडी या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.

या कामाचे भूमिपूजन सरपंच विकास बेटकर आणि पांडुरंग भोजने यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार शेखर निकम, जगन खेडेकर, वसंत तटकरे, सुजित तटकरे, शशिकला महाडिक आदींच्या रस्त्यासाठी जागा देणारे ग्रामस्थ व मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट संगमेश्वर शाखा मुंबईचे कार्याध्यक्ष जी. झे. टोपरे यांनी स्वखर्चातून रस्त्यासाठी योगदान दिले. दत्ताराम भालेकर, बाबुराव भालेकर यांनी या कामासाठी अथक परिश्रम घेतले.

.................

संगमेश्वर तालुक्यातील मुचरी भालेकरवाडी ते धाकोंडी या रस्त्याचे भूमिपूजन विकास बेटकर, पांडुरंग भोजने यांनी केले. यावेळी विनोद मिरगल, जी. झे. टोपरे, दत्ताराम भालेकर, बाबुराव भालेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Bhalekarwadi to Dhakondi road work