शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या बेपत्ता सोने व्यावसायिकाचा रत्नागिरीत खून, तिघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:49 IST

आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले

रत्नागिरी : रत्नागिरीत बेपत्ता झालेल्या ठाण्यातील सोने व्यावसायिक कीर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा मृतदेह सापडला आणि त्याचा गळा आवळून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. आर्थिक व्यवहारातून रत्नागिरीतील सुवर्णकार भूषण खेडेकर याने आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने हा खून केले असल्याचे तपासात पुढे आले आणि पोलिसांनी भूषण खेडेकर व अन्य दोघांना बेड्या ठोकल्या. भूषणने हत्या केल्याची कबुली पोलिसांना देत आपणच मध्यरात्री कोठारी यांचा मृतदेह आबलोलीनजीकच्या नदीत फेकल्याचे पोलिसांना सांगितले आहे.अटक केलेल्या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मृतदेह घेऊन जाण्यासाठी वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली आहे. एका व्यापाऱ्यानेच व्यापाऱ्याचा खून केल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भूषण सुभाष खेडेकर (४२ रा. खालची आळी), महेश मंगलप्रसाद चौगुले (३९, रा. मांडवी, रिक्षाचालक), फरीद महामुद होडेकर (३६, रा. भाट्ये , खोतवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.सोने विक्रीसाठी रत्नागिरी बाजारपेठेत आलेले ठाणे भाईंदर येथील सोने व्यापारी कीर्तीकुमार कोठारी सोमवारी बेपत्ता झाले. मंगळवारी त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांचा मुलगा करण बुधवारी रत्नागिरीत दाखल झाला. त्याने आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले आणि या प्रकरणाचा वेगाने उलगडा झाला.

दुकानात गेले; पण बाहेर नाही आले

बेपत्ता कीर्तीकुमार यांचा शोध घेताना पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यावेळी कीर्तीकुमार त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये आत गेलेले दिसले. मात्र ते दुकान बंद होईपर्यंत दुकानातून बाहेरच आले नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दुकानमालक भूषण खेडेकर यांची चौकशी केल्यानंतर त्याने दोन मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे आणि मृतदेह आबलोली येथे टाकल्याचे कबूल केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस