शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला गुजरातमधून अटक, एक कोटी पेक्षा जास्त फसवणूक केल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:04 IST

दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्रातही गुन्हे दाखल

रत्नागिरी : बनावट ट्रेडिंग ॲप्लिकेशन व क्रिप्टाे करन्सीद्वारे जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला खेड पाेलिसांनी गुजरातमधून रविवारी सायंकाळी अटक केली आहे. नारायानलाल शंकरलाल जाेशी (४२, रा. भावना पार्क, गाेडदरा, सुरत-गुजरात, सध्या रा. प्लास्मा, उदयपूर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. यापूर्वी याप्रकरणी चंडीगड येथून एकाला अटक केलेली आहे.याप्रकरणी खेड पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. फिर्यादीची १९ एप्रिल २०२४ ते २५ मे २०२४ या कालावधीत एपीके लर्निंग ग्रुपवरील ट्रेडिंगबाबतच्या गाेष्टी व माेबाइलवर पाठविलेले मेसेजद्वारे पैसे गुंतविण्यास सांगितले हाेते. पैसे गुंतवून जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्याचे आमिष दिले हाेते. त्यानंतर फिर्यादीची तब्बल २४ लाख ८५ हजारांची फसवणूक केली हाेती. या रकमेपैकी दहा लाख रुपये नारायानलाल जाेशी याच्या बँकेत जमा झाल्याचे तपासात पुढे आले हाेते. त्याआधारे त्याचा उदयपूर-राजस्थान व सुरत-गुजरात येथे शाेध घेण्यात आला. मात्र, ताे पाेलिसांना गुंगारा देत हाेता.

त्यानंतर पाेलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ताे सुरत येथील भावना पार्क येथे बँक खाते, चेकबुक, एटीएम व बँकेशी संलग्न असणारे सिमकार्ड घेण्यासाठी येणार असल्याचे कळले. त्यानंतर पाेलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून माेबाइल व सिमकार्ड, बँक पासबुक, चेकबुक ताब्यात घेतले आहे. ही कारवाई खेड पाेलिस स्थानकाचे पाेलिस निरीक्षक नितीन भाेयर, पाेलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, हेड काॅन्स्टेबल दीपक गाेरे, रमिज शेख, पाेलिस काॅन्स्टेबल राम नागुलकवार, वैभव ओहाेळ, नीलेश शेलार, सायबर पाेलिस स्थानकाचे काॅन्स्टेबल साैरभ कदम यांनी केली.

एक काेटीपेक्षा जास्त फसवणूकया प्रकरणात स्वत:चे व इतरांचे बँक खाते वापरून क्रिप्टाे करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून लाेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने आतापर्यंत सुमारे एक काेटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्रातही गुन्हे दाखलनारायानलाल जाेशी याच्यावर दिल्ली, बंगळुरू, महाराष्ट्र या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. ताे काेणत्याही खाेटा व्यापार असल्याचे दाखवून बँकेत खाते उघडत हाेता. बँक खात्यास प्राप्त हाेणारे अनटायटल ट्रान्झॅक्शन अप टू ५ लाख या सेवेद्वारे लाखाेंची फसवणूक करत हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस