शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार परत करणाऱ्यांमागे रहा

By admin | Updated: March 27, 2016 01:03 IST

प्रवीण बांदेकर : गणपतीपुळेत राज्य शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गणपतीपुळे : लेखक, कलावंत वा अन्य कोणत्याही बौद्धीक क्षेत्रातील लोक केवळ आपल्यापुरतेच पाहून स्वान्तसुखाय जगत असल्याचे चित्र दिसते. समाजातील काही मूठभर लोकांना का होईना, पण या गोष्टीची टोचणी आहे. वैयक्तिक मान, सन्मानाच्या पलिकडे जात समाजाच्या व्यापक भल्यासाठी ते काहीतरी कृ ती करु पहात आहेत, हे चित्र निश्चितच दिलासादायक आहे. अशावेळी समाजवादाची मुळे मानणाऱ्या आपण सर्व सजग भारतीय नागरिकांनीही या पुरस्कार परत करणाऱ्या मान्यवरांच्या मागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे परखड मत संमेलनाध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केले. ते गणपतीपुळे येथे सहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या संदर्भात विचार करताना वाटतं की, सांस्कृ तिक वैशिष्ट्यांचे वेगळेपण आजच्या जागतिकीकरणाच्या झंझावातात टिकून ठेवण्याच्या दृष्टीने समाजातील ज्या काही घटकांना ठोस भूमिका घेऊन गंभीरपणे काही करता येण्यासारखं आहे. त्या घटकात शिक्षक आणि लेखकांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. कालपरवापर्यंत आपल्या समाजात लेखक आणि शिक्षक यांच्याविषयीचा अंत्यस्थ आदर आणि त्यांचा समाजमनावर काहीएक नैतिक धाक असलेला दिसून येत होता. त्यामागे जी काही महत्वाची कारणे होती, त्यातील प्रमुख कारण अर्थातच हे लेखक किंवा शिक्षक व्यवस्थेच्या, सरकारच्या किंवा कुणाच्याही दावणीला बांधले गेले नव्हते. मूठभर व्यक्तिगत स्वार्थासाठी आपली शिक्षक वा लेखक ही ओळख विकली गेली नव्हती, अशा शब्दात बांदेकर यांनी खंत व्यक्त केली. चारित्र, साधनसुचिता, नैतिकता यांच्यासारख्या मूल्यांना ते जीवापाड जपत होते हेच दिसून येईल. आज परिस्थिती दोन्ही बाजूला बदलून गेली आहे. विकणारे आणि विकत घेणारे यांचा चेहरा एकच होऊन गेला आहे. वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या नावाखाली सामान्य लोकांच्या जगण्यात हस्तक्षेप करताना ज्यांच्या जमिनी जाताहेत, ज्यांच्या रोजीरोटीच्या साधनांवर गदा येतेय असे शेतकरी, मच्छीमार, सामान्य लोक आपापल्या अस्तित्वासाठी संघर्ष करु लागलेले गावागावातून दिसून येत आहेत. पण अशा मूकसमुहाच्या आक्रोशाला शब्द देण्यासाठी त्यांच्या बरोबरीने लढ्यात उतरण्यासाठी किती बुद्धीजीवी पांढरपेशे लेखक, कवी, शिक्षक, प्राध्यापक आज दिसताहेत, हेही विचार करण्यासारखेच आहे. म्हणूनच शिक्षक आणि साहित्यिक हे दोनच घटक असे आहेत की, जे या बिघडत चाललेल्या काळाला वेसण घालू शकतात. खडू आणि लेखणीमध्ये तलवारी आणि बंदूकांपेक्षाही जास्त सामर्थ्य आहे, हे आजवरच्या इतिहासावरुन वेळोवेळी सिद्ध झाले असल्याचे प्रा. प्रवीण बांदेकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर) माणूस अन् डुक्कर आज जॉर्ज आॅरवेल या लेखकाच्या ‘अ‍ॅनिमल फॉर्म’ या रुपकात्मक कांदबरीची आठवण होते. माणसाच्या शोषणाच्या विरोधात बंड करुन उठलेले प्राणी विशेषत: त्यातील डुकरं आपलं प्राणीपण विसरुन हळूहळू माणसाचं अनुकरण करु लागतात. माणसात उठबस करु लागतात. त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणं, त्यांच्यासोबत जुगार खेळणं, नशापाणी, पार्ट्या करणे वगैरेही सुरु होते. शेवटी एकवेळ अशी येते की, डुकराचं नेतृत्व मान्य केलेल्या अन्य प्राण्यांना आता डुक्कर कुठले आणि माणसे कुठली हेच कळेनासं होत. इतकी या दोन्ही परस्पर भिन्न वृत्तीच्या गोष्टींची सरमिसळ होऊन गेलेली असते. काहीसं तसचं ज्ञानदान करणारे आणि या गोष्टींना बाजारात मांडणारे या दोहोंच्या बाबतीतही घडू लागलंय की काय, अशी एक भीती वाटत असल्याचे बांदेकर म्हणाले.