गणपतीपुळेत व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर, वाचवण्यासाठी प्रयत्न

By मनोज मुळ्ये | Published: November 13, 2023 01:45 PM2023-11-13T13:45:14+5:302023-11-13T13:46:28+5:30

त्या पिल्लाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

baby whale beaches in ganapatipule efforts to save | गणपतीपुळेत व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर, वाचवण्यासाठी प्रयत्न

गणपतीपुळेत व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर, वाचवण्यासाठी प्रयत्न

मनोज मुळ्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर चक्क व्हेल माशाचे पिल्लू वाहत आले आहे. ते जिवंत असल्याने त्याला वाचवण्यासाठी ग्रामस्थ, पर्यटक, वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

सोमवारी सकाळी व्हेल माशाचे पिल्लू गणपतीपुळे किनारी वाहत आले. या पिल्लाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे पर्यटन विकास महामंडळाच्या हाॕटेलमध्ये आलेले पर्यटक, इतर पर्यटक तसेच ग्रामस्थांनी त्याला समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.

आता मत्स्य विभागच्या बोटीच्या सहाय्याने व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात येणार आहे. समुद्राला ओहोटी असल्याने व्हेल माशाचे पिल्लू वाळूत अडकून पडले आहे. त्या पिल्लाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: baby whale beaches in ganapatipule efforts to save

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.