शिवसेना पक्ष-चिन्ह मिळताच योगेश कदम समर्थक आक्रमक, ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 21:22 IST2023-02-17T21:22:39+5:302023-02-17T21:22:47+5:30
पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळतात आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला.

शिवसेना पक्ष-चिन्ह मिळताच योगेश कदम समर्थक आक्रमक, ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली
शिवाजी गोरे
दापोली- आज उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला. आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट आहे, तर शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, दापोलीत दोन्ही गटात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला.
पक्षाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळतात आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. आम्हीच खरे शिवसैनिक आमचाच खरा पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही कार्यालयात बसायचे नाही, तुमचे इथे काय काम आहे, असे म्हणत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दापोली शिवसेना शहर शाखेतून बाहेर काढत शिवसेना शहर शाखा ताब्यात घेतली.
शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेना शाखेत घुसले. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दोन्ही गटातजोरदार राडा झाला. यावेळी योगेश कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण आहे.