रत्नागिरीत आणखी १८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:08 IST2020-06-01T13:05:54+5:302020-06-01T13:08:56+5:30
मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.

रत्नागिरीत आणखी १८ पॉझिटिव्ह
रत्नागिरी : मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमधील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८७ इतका झाला आहे.
मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.
रविवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २६९ इतकी होती. तर रत्नागिरी जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरी ७, खेडमधील कळंबणी रुग्णालयातील ८, गुहागरातील १ आणि राजापुरातील २ अहवालांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ७ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या १०० झाली आहे. तसेच ३२ अहवाल निगेटिव्ह आले असून, दोन अहवालांचे निष्कर्ष आलेले नाहीत.