शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
3
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
4
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
5
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
6
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
7
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
8
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
9
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
10
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
11
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
12
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
13
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
14
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
15
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
16
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
17
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
18
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
19
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
20
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने

चिपळूण अन् खेड शहराच्या स्वच्छतेसाठी एकनाथ शिंदेंकडून तात्काळ 3 कोटींच्या निधीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 23:14 IST

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे.

ठळक मुद्देशहराच्या दौऱ्यात पूर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन चिखल, कचऱा स्वच्छतेसाठी खेड नगर परिषदेला १ कोटींचा निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली. म्हणजेच एकूण दोन्ही शहराच्या स्वच्छतेसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा शिंदे यांनी केली आहे.

रत्नागिरी - चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसेच, खेड शहराच्या दौऱ्यात पूर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन चिखल, कचऱा स्वच्छतेसाठी खेड नगर परिषदेला १ कोटींचा निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली. म्हणजेच एकूण दोन्ही शहराच्या स्वच्छतेसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा शिंदे यांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचं या पुरामुळे अतोनात नुकसान झालं. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचेदेखील शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच खेड शहरालाही 1 कोटीचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळदेखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह  पाठवू असंही त्यांनी जाहीर केलं. चिपळूण शहराला नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, चिपळूणचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRatnagiri Floodरत्नागिरी पूर