शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

जलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर,  दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:58 IST

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून ह्यजलयुक्त शिवार योजनाह्ण एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजनेचा चौथा आराखडा जाहीर दोन टप्पे पूर्ण, तिसऱ्या टप्प्याची कामे सुरु

रत्नागिरी : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यात सन २०१५ - १६पासून जलयुक्त शिवार योजना एकाचवेळी सुरू करण्यात आली. या योजनेतील पहिल्या दोन टप्प्यांतील कामांची पूर्तता झाली असून, तिसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही सुरू आहेत. योजनेचा चौथ्या टप्पा सन २०१८-१९मध्ये राबविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ७३७ कामांची पूर्तता करण्यात येणार असून, त्यासाठी १७ कोटी १७ लाख ६ हजार रूपयांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या कामांना प्रारंभ होणार आहे.या योजनेतील चौथ्या टप्प्यांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली, मालगुंड, निवेंडी, लांजा तालुक्यातील कोंडगे, कोंडगाव, वाकेड, राजापूर तालुक्यातील होळी, मंदरूळ, धामणवणे, भोम, चिपळूण तालुक्यातील गोंधळे (माजरेकोंड), पोसरे, टेरव, मासरंग, निवदे, निवे (बु), संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे, विघ्रवली, माभळे, भडकंबा, गुहागर तालुक्यातील चिखली, उमराट, दापोली तालुक्यातील हर्णै, कवडोळी, गावराई, पोफळवणे या गावांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील चिंचवळी, किंजळेतर्फ नातू, वाडीजैतापूर, सवेणी, मंडणगड तालुक्यातील अडखळवण, घोसाळे या गावांची निवड करण्यात आली आहे.जलयुक्त शिवारच्या जिल्ह्यातील कामांची पूर्तता करण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद कृषी विभाग, जलसंधारण या विभागांकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे ४९३ कामांसाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजारांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघे एक काम असून, त्यासाठी एक लाख २१ हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे १७० कामांची जबाबदारी असून, त्यासाठी एक कोटी ८६ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील ६१ कामांसाठी ३८ लाख ६० हजार रूपये निधीची आवश्यकता आहे. जलसंधारण विभागाकडे १२ कामांची जबाबदारी असून, त्यासाठी २ कोटी १४ लाख २ हजार रूपयांची निधी अपेक्षित आहे.विविध तालुक्यांसाठी आवश्यक निधीरत्नागिरी तालुक्यातील ११९ कामांसाठी १ कोटी २ लाख ३३ हजार रूपये निधी आवश्यक आहे. लांजा तालुक्यात ४६ कामे निश्चित करण्यात आली असून, त्यासाठी २ कोटी २६ लाख ३८ हजारांचा निधी लागणार आहे. राजापूर तालुक्यात ३९ कामांचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता एक कोटी ७ लाख ४४ हजारांचा निधी लागणार आहे.

गुहागरात ७४ कामे करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी ६२ लाख ९९ हजार, संगमेश्वरातील ७५ कामांसाठी १ कोटी ८ लाख ५९ हजार रूपयांचा निधी आवश्यक आहे. खेड तालुक्याला १२३ कामांचे उद्दिष्ट असून, ३ कोटी १५ लाख ३८ हजार रुपये, दापोलीतील ११४ कामांसाठी ३ कोटी ९७ लाख ८८ हजार, मंडणगडातील ५१ कामांंसाठी एक कोटी ९ लाख ३० हजारांचा निधी अपेक्षित आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRatnagiriरत्नागिरी