Ratnagiri: मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांचा पदभार तडकाफडकी काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:14 IST2025-01-31T16:14:39+5:302025-01-31T16:14:59+5:30
रत्नागिरी : जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेेण्यात आला असून, त्या पदाचा ...

Ratnagiri: मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांचा पदभार तडकाफडकी काढला
रत्नागिरी : जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेेण्यात आला असून, त्या पदाचा कार्यभार सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पालव यांच्याकडे देण्यात आला होता. तो आता काढून घेण्यात आला आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), रत्नागिरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहरण व संवितरणाच्या अधिकारासह कुवेसकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात येत आहे. हा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी गुरुवारी दिला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करून तसा अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे.