रत्नागिरीत साकारतंय ‘इनडोअर’ क्रीडा संकुल, २३ कोटी रुपये खर्च करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 18:51 IST2025-01-07T18:51:25+5:302025-01-07T18:51:37+5:30

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे. तब्बल २३ काेटी रुपये खर्चून हे ...

An indoor sports complex is being built in Ratnagiri, Rs 23 crore will be spent | रत्नागिरीत साकारतंय ‘इनडोअर’ क्रीडा संकुल, २३ कोटी रुपये खर्च करणार

रत्नागिरीत साकारतंय ‘इनडोअर’ क्रीडा संकुल, २३ कोटी रुपये खर्च करणार

रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे. तब्बल २३ काेटी रुपये खर्चून हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉलसारख्या मैदानी खेळांसाठी इनडोअर क्रीडांगण उभारले जात आहे. त्याचबरोबर १०० खोल्यांचे वसतिगृह उभारण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी रत्नागिरीत येणाऱ्या खेळाडू, शिक्षक यांच्या निवासाचा प्रश्नही कायमस्वरूपी सुटणार आहे.

रत्नागिरीतील एमआयडीसीमध्ये सर्व सोयीसुविधांनीयुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पंधरा वर्षांपूर्वी आघाडीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कालावधीत संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर बराच काळ निधीची तरतूद न झाल्यामुळे काम रखडले; परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा क्रीडा संकुलासाठी मागील वर्षी पाठपुरावा केला. क्रीडामंत्र्यांकडे झालेल्या बैठकांमुळे २९ कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामधून सर्व सोयीसुविधांनीयुक्त जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

एमआयडीसी येथे ११.५० एकर जागेत हे संकुल उभारण्यात येत आहे. जिल्हा संकुलासाठी २९ कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यातील ७ कोटी मारुती मंदिर येथील संकुलावर खर्ची करण्यात आला. उर्वरित २३ कोटींमधून एमआयडीसी येथे संकुल उभारले जाणार आहे. तसेच मुला-मुलींना राहण्यासाठी ५०० बेडचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • इनडाेअर क्रीडांगणासाठी ३.५० कोटी
  • इनडाेअर क्रीडांगण ५७ बाय ३२ मीटर
  • ४०० मीटरचा सिंथेटिक धावण्याचा मार्ग
  • ८ ते १० कोटी खर्च


जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांची मैदाने उभारण्याचे कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. या क्रीडा संकुलामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सुसज्ज क्रीडांगण मिळणार आहे. - विजय शिंदे, प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी

Web Title: An indoor sports complex is being built in Ratnagiri, Rs 23 crore will be spent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.