शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना भाजीपाला, कडधान्य बियाण्यांचे वाटप

By admin | Updated: November 18, 2015 00:15 IST

पी. एन. देशमुख : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा उपक्रम; भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामात मदत

रत्नागिरी : भाजीपाला व कडधान्य क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुुदानावर ११ क्विंटल बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. भातशेतीला जोडधंदा म्हणून रब्बी हंगामामध्ये भाजीपाला व कडधान्याचे जास्तीत जास्त उत्पादन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात भाजीपाला व कडधान्य कमी प्रमाणात होत असल्याने तो घाटमाथ्यावरून येतो. अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या या मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने तेथील शेतकरी सधन झाला आहे. आपल्या जिल्ह्यातही भाजीपाला व कडधान्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीनंतर रब्बी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य आदींचे पीक घेतल्यास स्थानिक बाजारपेठेत त्यांना चांगला भाव मिळून त्यांच्या आर्थिक फायदाही होईल. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी भाजीपाला व कडधान्यांचे बियाणे ५० टक्के अनुदानावर लवकरच वाटप करण्यात येणार आहे. हे बियाणे कोकण कृषी विद्यापीठाकडून उत्पादित केलेले असल्याची माहिती पी. एन. देशमुख यांनी दिले. (शहर वार्ताहर)५० टक्के अनुदानावर औषधे, कीटकनाशके पुरवणारराज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन विकास मंडळामार्फत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पीक संरक्षण औषधासाठी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पीक संरक्षण औषधाचा व कीटकनाशकाचा पुरवठा करण्यात येणार आहे. ८३६६ लीटर्स कीटकनाशके, औषधे ५० टक्के अनुदानावर वाटप करणार आहेत.शेतकऱ्यांना आवाहनचवळी, भेंडी, घेवडा, माठ, वाल, कुळीथ, मोहरी, काकडी, कारली, पडवळ, शिराळी, दुधी भोपळा, घोसाळी, मिरची, वांगी, मुळा, वाली आदिंचे बियाणे ५० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. या बियाण्यांची शेतकऱ्यांनी उचल करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी पी.एन. देशमुख यांनी केले आहे.