राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम दुसऱ्यांदा विजेती, मुंबईत पार पडली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 12:54 IST2022-04-26T12:53:30+5:302022-04-26T12:54:34+5:30
आतापर्यंत तिने कॅरम स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन राैप्य पदके मिळवली आहेत. तिच्या या यशाने कोंडगाव, साखरपा परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत आकांक्षा कदम दुसऱ्यांदा विजेती, मुंबईत पार पडली स्पर्धा
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावची सुकन्या आकांशा उदय कदम हिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणचा सलग दाेन सेटमध्ये पराभव करत दुसऱ्यांदा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा मुंबईतील शिवाजीपार्क जीमखाना येथे खेळविण्यात आली हाेती.
मुंबई येथे १३ वी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. तीन दिवस ही स्पर्धा खेळविण्यात आली हाेती. या स्पर्धेतील महिला एकेरीचा सामना आकांक्षा कदम आणि सिंधुदुर्गची केशर निर्गुण यांच्यात रंगला हाेता. आकांक्षाने सलग दोन सेटमध्ये केशरचा पराभव करून विजेत्या चषकावर आपले नाव कोरले.
आकांशाने याआधी देशाबाहेर खेळताना मालदीवमध्ये दोन सुवर्ण पदके पटकावली हाेती. आतापर्यंत तिने कॅरम स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन राैप्य पदके मिळवली आहेत. तिच्या या यशाने कोंडगाव, साखरपा परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. अजूनही अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करायची असल्याचे आकांशा कदम हिने सांगितले.