दुचाकी अपघातातील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:25+5:302021-05-31T04:23:25+5:30
राजापूर : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व जिल्हा शासकीय रूग्णालय उपचार सुरू असलेल्या दीपक चंद्रकांत जोशी (४०, रा. ...

दुचाकी अपघातातील गंभीर जखमी प्रौढाचा मृत्यू
राजापूर : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व जिल्हा शासकीय रूग्णालय उपचार सुरू असलेल्या दीपक चंद्रकांत जोशी (४०, रा. ओशीवळे, बौध्दवाडी) या प्रौढाचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मयत दीपक जोशी यांच्या विरोधात २९ मे राेजी गुन्हा दाखल केला आहे. ओशीवळे ते परटवली मार्गावर शनिवारी (दि.२२) हा अपघात झाला होता.
दीपक जोशी हे आपल्या ताब्यातील दुचाकीने ओशीवळे येथून परटवलीकडे जात हाेते. परटवली रस्त्यावर अपघात झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दीपक जोशी यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी मयत दीपक जोशी यांच्या विरोधात हयगयीने व अतिवेगाने गाडी चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल कमलाकर तळेकर व पोलीस कातरे करत आहेत.