मुसळधार पावसाचा बळी, चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 01:27 PM2021-07-14T13:27:12+5:302021-07-14T13:29:04+5:30

Rain Chiplun Ratnagiri : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Adult dies after being swept away in flood waters in Chiplun | मुसळधार पावसाचा बळी, चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा बळी, चिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देचिपळुणात पुराच्या पाण्यात वाहून प्रौढाचा मृत्यूगेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा बळी

चिपळूण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

विकास शांताराम खडपेकर ( ४८, रा. वाघिवरे, चिपळूण ) असे बडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तालुक्यात संततधार पावसामुळे नदी - नाले तुडूंब भरून वाहत आहेत. असे असताना सोमवारी झालेल्या पावसामुळे वाघिवरे नदीची पाणी पातळीही वाढली आहे.

या नदीवर खडपेकर हे सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. या घटनेनंतर नदी परिसरात त्याचा शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

Web Title: Adult dies after being swept away in flood waters in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.