Ratnagiri Crime: ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून प्रौढाला घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:43 IST2025-03-22T17:42:50+5:302025-03-22T17:43:43+5:30

रत्नागिरी : शेअर ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून तरवळ-जाकादेवी (ता. रत्नागिरी ) येथील प्रौढाची २५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ...

Adult cheated by pretending to make a profit in trading | Ratnagiri Crime: ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून प्रौढाला घातला गंडा

Ratnagiri Crime: ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून प्रौढाला घातला गंडा

रत्नागिरी : शेअर ट्रेडिंगमध्ये नफा झाल्याचे भासवून तरवळ-जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील प्रौढाची २५ हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी २०२५ रोजी घडली आहे.

या फसवणूकप्रकरणी अरविंद सीताराम कांबळे (४४, रा. विल्ये, पोस्ट तरवळ, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुरुवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अरविंद कांबळे घरी असताना साेशल मीडियावर शेअर ट्रेडिंगसंदर्भात माहिती घेत होते. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक क्यूआर कोड पाठवला. त्यांनी तो कोड स्कॅन करून २५ हजार रुपये ट्रान्सफर केले.

त्यानंतर अज्ञाताने त्यांना १ लाख ४९ हजार ३७८ रुपयांचा नफा झाल्याचे भासवून त्या नफा झालेल्या रकमेपैकी ३० टक्के रकमेचे कमिशन म्हणून आगाऊ स्वरूपात मागणी केली. दरम्यान, कांबळे यांनी गुंतवणूक केलेली २५ हजारांची रक्कम तसेच नफा झालेली रक्कम परत न करता फसवणूक केली.

Web Title: Adult cheated by pretending to make a profit in trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.