शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील धरण दुरुस्तीसाठी पुरेसा निधी : जयंत पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:19 IST

chilplun, ncp, jayantpatil, dam, ratnagirinews तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्दे धरणांचे ऑडिट होणार, तिवरे धरणफुटी आणि दुरूस्तीच्या प्रश्नाची घेतली गंभीर दखलपुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी देण्याची मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

चिपळूण : तिवरे धरणफुटीची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येताच यावर गांभीर्याने विचार करण्यात आला. राज्यातील ज्या-ज्या धरणांना गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशाठिकाणी दुरुस्तीची कामे तत्काळ हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे सांगितले.उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर तालुक्यातील कार्यकर्ता संवाद कार्यक्रम सावर्डे येथे आयोजित केला होता. यानिमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी माजी आमदार कै. निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, तिवरे धरणफुटीचा चौकशी अहवाल जलसंधारण खात्याच्या अखत्यारित येतो. मात्र, या धरणाच्या पुनर्बांधणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध केला जाईल. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर राज्यात सर्वच धरणांचे ऑडिट केले जात आहे. त्यामध्ये अति गळती आढळल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना केली जात आहे.अर्णव गोस्वामी प्रकरणी ते म्हणाले की, त्याचा सरकारच्या इमेजवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा त्याचा सरकारशी काहीही संबंध नाही. पीडित कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, शुभदा जोशी, शौकत मुकादम, बाबाजी जाधव उपस्थित होते.भाजपला टोलाअर्णब गोस्वामी प्रकरणात दोघांनी आत्महत्या केली असून, अशा विषयात त्या पीडित कुटुंबियांवर अन्याय व्हावा, असे कोणालाही अपेक्षित नाही. पण भाजपने हे प्रकरण समोर ठेवून आवाज उठवला तर त्यात काही विशेष नाही. कारण भाजपने तळागाळातील लोकांसाठी कधीही आवाज उठवलेला नाही, अशा मोजक्या शब्दात जयंत पाटील यांनी भाजपला टोला मारला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDamधरणRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसChiplunचिपळुण