आकेशियाच्या झाडांची गुहागरात राजरोस कत्तल

By Admin | Updated: June 24, 2016 00:42 IST2016-06-24T00:03:43+5:302016-06-24T00:42:55+5:30

गुहागर तालुका : चिखली - तळवली रस्त्यावरील प्रकार

Acoustic herbaceous palace | आकेशियाच्या झाडांची गुहागरात राजरोस कत्तल

आकेशियाच्या झाडांची गुहागरात राजरोस कत्तल

गुहागर : तालुक्यातील रस्त्यावर कायम सावली राहावी या उद्देशाने लावलेली आकेशियाची झाडे तोडली जात आहेत. चिखली - तळवली रस्त्यावरील झाडांची तोड सुरु असून, वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा शासनाच्या वन विभागामार्फत आकेशियाची झाडे लावण्यात आली आहेत. आकेशिया झाडांची मुळे जमिनीत खोलवर पसरुन पाणी शोषतात. यामुळे या झाडांना बारमाही पाणी दिले नाही तरी कुठेही लागवड केल्यास ती जगतात. या वैशिष्ट्यामुळे आकेशिया झाडांची लागवडीसाठी निवड करण्यात येते. याच कारणामुळे आकेशिया झाडांची तोड केली जाते. रस्त्याशेजारी शासकीय जागेत ही झाडे लावलेली असताना या मागील खासगी जागेत कुठलीही लागवड केलेली असल्यास या झाडांना लावलेले पाणी आकेशियाची झाडे शोषून घेतात. पर्यायाने लागवडीला पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच शासनाची झाडे आपल्या जागेसमोर असल्याने ती आपलीच आहेत, असे समजून ती राजरोसपणे तोडली जातात. यापूर्वी याच रस्त्यावर एका ग्रामपंचायतीच्या उपसरपंचानेच अशी झाडे तोडण्याचे धाडस केले होते.
आकेशियाची झाडे रस्त्यांचे सौंदर्यही वाढवत असतात. या झाडांची तोड करणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

निर्बंध कोणाचे : प्रमाण अधिक
शासनाच्यावतीने रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, या झाडांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे. ग्रामीण भागात झाडांची तोड होण्याचे प्रमाण अधिक आहे. राजरोसपणे त्यांची तोड करून त्याची विक्री केली जाते. काही ठिकाणी जळाऊ लाकूड म्हणून वापर केला जात आहे. राजरोसपणे होणाऱ्या या वृक्षतोडीवर कोणाचाही निर्बंध नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही वृक्षतोड आजही खुलेआमपणे करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Acoustic herbaceous palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.