शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: वृद्धेच्या खून प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 14:57 IST

कडवई येथील खून प्रकरण, दाेघांवर पाेलिसांची नजर

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई मोहल्ला येथील बानू फकीर महंमद जुवळे (वय ७०) या वृद्धेच्या खून प्रकरणातील आराेपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अटक केलेली नाही, तसेच अन्य एक महिला वयाेवृद्ध असल्याने न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला अटक करण्यात येणार आहे.हुमायू शकील काझी (रा. फणसवणे, ता. संगमेश्वर) असे विष प्राशन केलेल्या आराेपीचे नाव आहे. बानू फकीर महंमद जुवळे या महिलेला हाजिरा मुसा माखजनकर (रा. कडवई, ता. संगमेश्वर) हिने बाहेर जाण्याचे सांगून तुरळ येथे आणले हाेते. त्यानंतर, कडवई येथील अट्टल गुन्हेगार रिझवान जुवळे आणि त्याचा साथीदार हुमायू काझी यांच्या ताब्यात दिले. त्यांनी बानू जुवळे या महिलेचा खून करून तिच्या अंगावरील दागिने चोरले आणि तिचा मृतदेह कुंभारखाणी येथील जंगलात फेकून दिला हाेता.नातेवाइकांनी बेपत्ता म्हणून फिर्याद देताच, संगमेश्वर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी या प्रकरणाचा तपास करत खुनाचा छडा लावला. या खूनप्रकरणी मुख्य संशयित आराेपी रिझवान महामुद जुवळे (रा. कडवई, ता. संगमेश्वर) याला अटक केली आहे.मात्र, महिला आरोपी हाजिरा माखजनकर ही ज्येष्ठ नागरिक असल्याने न्यायालयीन बाबी पूर्ण करून तिला अटक केली जाणार आहे, तसेच हुमायू काझी याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ताे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती सुधारताच त्यालाही अटक केली जाईल, असे पाेलिसांनी सांगितले.

साेनाराकडून दागिने हस्तगतवृद्धेच्या अंगावरील दागिने चाेरून ते एका साेनाराला विकल्याची माहिती रिझवान जुवळे याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्या साेनाराकडून ३०.४५० ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत केले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस