चिपळुणातील जवानाचा मध्यप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:25 PM2020-02-25T15:25:12+5:302020-02-25T15:26:11+5:30

चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द येथील विशाल रघुनाथ कडव यांचे मध्यप्रदेशमधील सागर शहरात येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Accidental death of Chiplun jawan in Madhya Pradesh | चिपळुणातील जवानाचा मध्यप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चिपळुणातील जवानाचा मध्यप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देचिपळुणातील जवानाचा मध्यप्रदेशमध्ये अपघाती मृत्यूपिंपळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चिपळूण : तालुक्यातील पिंपळीखुर्द येथील विशाल रघुनाथ कडव यांचे मध्यप्रदेशमधील सागर शहरात येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गेले १३ वर्षे विशाल कडव हे मराठा बटालियन मध्ये पॅरा कमांडो म्हणून काम करत होते. मध्यप्रदेशमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त पिंपळीखुर्द येथील गावी येताच गावावर शोककळा पसरली होती.

सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर त्यांचे पार्थिव आले, नंतर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पिंपळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Accidental death of Chiplun jawan in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.