मुंबई-गोवा हायवेवर अपघात; ७ जणांचा मृत्यू
By Admin | Updated: May 15, 2016 17:53 IST2016-05-15T10:17:18+5:302016-05-15T17:53:43+5:30
मुंबई- गोवा महामार्गावर रविवारी पहाटे एसटीची शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये भीषण अपघात झाला.

मुंबई-गोवा हायवेवर अपघात; ७ जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
इंदापूर, दि. १५ - मुंबई- गोवा महामार्गावर आज (रविवारी) पहाटे एसटीची शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा ७ वर गेला आहे. हा अपघाता इंदापूरजवळच्या रुद्रोली गावाजवळ सकाळी सहाच्या सुमारास झाला.
भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने समोरुन येत असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील एका प्रवाशाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात दम तोडला मृतांमध्ये ५ पुरुष, एक महिला आणि एका चिमुरडयाचा समावेश आहे.
शिवनेरीच्या चालकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. अपघातात एसटीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला त्यावरुन धडक किती जोरदार होती याची कल्पना येते.
मृतांची नावे खालीलप्रमाणे
- संतोष तुकाराम तांबे 43
- स्वाती स्वप्नील तांबे 35
- वृषभ स्वप्नील तांबे 8
- स्वप्नील राजाराम तांबे 35
- सूर्यकांत भिकू तांबे 47
- भिकू यशवंत तांबे 72
- सर्व रा. पेवे ता. मंडणगड
- प्रवीण सुरेश पांडव 29 चालक रा . डोंबिवली