Ratnagiri: बारसूत बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिस वाहनाला अपघात

By अरुण आडिवरेकर | Updated: April 24, 2023 11:47 IST2023-04-24T11:37:17+5:302023-04-24T11:47:12+5:30

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथे उतारात अपघात झाला.

Accident: An accident to a police vehicle going to Barsut Endowment | Ratnagiri: बारसूत बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिस वाहनाला अपघात

Ratnagiri: बारसूत बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिस वाहनाला अपघात

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण करण्यात येत आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आज सकाळी ८:३० वाजता आडिवरे गावाजवळील कशेळीकोंड येथे उतारात अपघात झाला. यामध्ये १७ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

राजापूर बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण आजपासून करण्यात येत आहे. काही स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी विविध भागातून पोलिस बंदोबस्तासाठी मागवण्यात आले आहेत. राजापूर येथे बंदोबस्तासाठी सिंधुदुर्ग येथून आलेली पोलिसांची गाडी आज सकाळी बारसूकडे निघाली होती. आडिवरेनजीक कशेळीकोंड येथे उताराचा अंदाज न आल्याने हे वाहन रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. जखमींना उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Accident: An accident to a police vehicle going to Barsut Endowment