शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

Ratnagiri: अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला आंबा येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:24 IST

देवरुख : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक ...

देवरुख : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक केली आहे. गणेश आनंदा जाधव (२४, रा. केर्ले, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.देवरुख पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरुखनजीकच्या हातीव येथील एका अल्पवयीन मुलीची व गणेश जाधव या तरुणाची देवरुख बसस्थानकावर भेट झाली होती. यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आपली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीविरोधात देवरुख पोलिस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १३७ (२), ८७ कलमान्वये दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली.पोलिसांनी माहिती घेतली असता त्याचे नाव गणेश जाधव असल्याचे समजले. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तो आंबा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपले सहकारी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव जाधव, हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सागर मुरुडकर, सचिन पवार, हवालदार अभिषेक वेलवणकर यांच्यासह मंगळवारी सकाळी १०:०० वाजता आंबा गाठले.गणेश त्या मुलीसोबत एका पडक्या घरात असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन देवरुख येथे आणले व मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले. गणेश जाधव याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दि. ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस