शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या डोळ्यासमोर तरुण अपघातात ठार, रस्त्याकडेला दुचाकीसह उभ्या असता एसटी बसने नेले फरफटत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:25 IST

चिपळूण : चालकाचा ताबा सुटल्याने एका एसटी बसने रस्त्याकडेला आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरश: फरपटत नेले. ...

चिपळूण : चालकाचा ताबा सुटल्याने एका एसटी बसने रस्त्याकडेला आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरश: फरपटत नेले. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणलगतच्या खेर्डी येथे घडली. अनिकेत विजय दाभोळकर (३४) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे वडीलही त्याच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलाचा अपघातीमृत्यू झाला.मंडणगड धाराशिव ही एसटी बस सकाळी ८ वाजता चिपळूण आगारातून मार्गस्थ झाली. चिपळूण-कऱ्हाड मार्गावर खेर्डी दत्तमंदिरासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्ता सोडून बस साइडपट्टीकडे वेगाने गेली. त्याचवेळी अनिकेत दाभोळकर हा भाजी आणि फळे घेण्यासाठी तेथे आपल्या दुचाकीसह उभा होता. बसने त्याला दुचाकीसह फरफटत नेले आणि अक्षरशः चिरडले.

अपघात घडताच शेकडो लोक घटनास्थळी जमा झाले. अनिकेतला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. एसटी बसचालकाला लाखोल्या वाहून काहीजण त्यांच्या अंगावरही गेले. अनिकेतला चिरडल्यानंतर बस तेथीलच एका फळ विक्रेत्याच्या शेडमध्ये घुसली होती. त्यामुळे त्याचेही नुकसान झाले. चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी खेर्डी येथील स्मशानभूमीत अनिकेत याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, मंडणगड डेपोचे एसटी चालक गोपाळ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.

सर्पमित्र म्हणून परिचितअनिकेत रेल्वेमध्ये कामाला होता. बुधवारी त्याच्या भावाचे लग्नकार्य उरकले. त्याची सत्यनारायणाची पूजा गुरुवारी होती. त्याच पूजेसाठी भाजी आणि फळे आणण्यासाठी अनिकेत वडिलांना सोबत घेऊन बाजारात आला होता. त्यावेळी हा अपघात घडला. अनिकेत सर्पमित्र म्हणून परिचित होता.

वडील काेसळलेअनिकेत आपल्या वडिलांसोबत खरेदीला आला होता. त्याचे वडील विजय दाभोळकर यांनी आपल्या डोळ्यांसमोर हा अपघात आणि आपल्या तरुण मुलाचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. त्यामुळे ते खाली काेसळले. हा प्रसंग सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू