शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गाडी वळवण्यावरून वाद, कोंडकारूळ येथील मच्छिमार तरुणाचा लोणावळ्यात खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:43 IST

गुहागर : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी ...

गुहागर : चारचाकी वाहन वळवताना दुसऱ्याला जागा देण्यावरून झालेल्या वादातून लोणावळा येथे गुहागर तालुक्यातील अडूर कोंडकारुळ गावच्या कमलेश तानाजी धोपावकर (४५) याची हत्या करण्यात आली. कमलेशचे अन्य दोन सहकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणात लोणावळा पोलिसांनी या घटनेमधील ९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून चारजणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.वादळ सदृश्य परिस्थिती होऊन मच्छीमारी थांबल्याने तालुक्यातील अडूर कोंडकारुळमधील कमलेश तानाजी धोपावकर, आपल्या १६ मित्रांसह एकविरा आईच्या दर्शनाला लोणावळा येथे भाड्याच्या वाहनाने गेले हाेते. देवदर्शन झाल्यानंतर सायंकाळी लोणावळा येथे त्याच ठिकाणी राहायला आलेल्या ४-५ जणांजवळ गाडी वळवण्यावरून त्यांचा वाद झाला. त्यातून कमलेश आणि सहकाऱ्यांना काठ्या व रॉडने मारहाण केली. यामध्ये कमलेशच्या डोक्यावर वर्मी घाव बसला. कमलेशचा सहकारी मनोज वरवाटकरचा (बोटीचा तांडेल) हात जायबंदी झाला तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला.गंभीर जखमी झालेल्या कमलेश याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्याच्या सहकाऱ्यांनी कमलेशचा मृतदेह साेमवारी कोंडकारुळ गावात आणला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. तातडीने प्रत्यक्षदर्शी व सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांचे तपशील गोळा केले. त्यानंतर ९ जणांपैकी दोघांना पोलिसांनी २५ मे रोजी लग्नाच्या मांडवातून पोलिसांनी उचलले. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलिस घेत आहेत.

पाचजणांचा शोध सुरुपाेलिसांनी आत्तापर्यंत निकेश कांबिरे, प्रतीक देशमुख, यश कैलास पडवळ (तिघेही रा. वेहेर गाव तामावळ, लोणावळा ग्रामीण) आणि गौस संजय पट्टाधारी, (रा. तुंगार्ली, लोणावळा) यांना अटक केली आहे. उर्वरित पाचजणांचा शोध लोणावळा पोलिस घेत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस