Ratnagiri: राजापुरात आठवडा बाजारात झाड उन्मळून पडले; एकाचा मृत्यू, चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 18:15 IST2023-07-13T18:10:32+5:302023-07-13T18:15:17+5:30
विनोद पवार राजापूर : राजापूर आठवडा बाजारात गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर ...

Ratnagiri: राजापुरात आठवडा बाजारात झाड उन्मळून पडले; एकाचा मृत्यू, चौघे जखमी
विनोद पवार
राजापूर : राजापूर आठवडा बाजारात गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज, गुरुवार (दि.१३) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
रामचंद्र बाबाजी शेळके (वय ४८ रा. बारसु) असे मृताचे नाव आहे. तर मुमताज आसिफ फनसोपकर (४८), यास्मिन शौकत कोत्वडकर (३५), सायका इरफान पावसकर (५५) अशी जखमींची नावे आहेत. एका जखमीचे नाव समजू शकले नाही.
राजापुरात गणेश घाट शेजारी आठवडा बाजार भरतो. आज, गुरुवारी बाजार भरला असता अचानक गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यात एकाचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. किरकोळ जखमींवर राजापूर येथील रुग्णालय उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.