शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावेळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडली सळी; शिंदे युवासेना, मनसेकडून रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:19 IST

मुंबई-गोवा महामार्ग अर्धा तास रोखला

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर शहरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. डीबीजे महाविद्यालयासमोर एका पिलवरून लोखंडी सळी टाकण्याचे काम सुरू असताना त्यातील एक सळी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर पडली. यात विद्यार्थी बालंबाल बचावला असून त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली.यावेळी संतप्त शिंदे युवासेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको केला. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही वर्षापासून शहरातील बहादूरशेखनाका ते पाग बौद्धवाडी दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरवातीपासूनच या ना त्या कारणाने वादग्रस्त बनले आहे. दोन वर्षापुर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे गर्डर कोसळल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर काही महिन्यातच पिलरवरून दोन कर्मचारी पडून गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ सुरक्षितेसाठी पुलाच्या ठिकाणी लावलेली जाळी एका धावत्या ट्रकला अडकली होती. त्यामुळे देखील मोठा धोका निर्माण झाला होता. याशिवाय सातत्याने या परिसरात किरकोळ व मोठे अपघात आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधीत ठेकेदार कंपनीला प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना सातत्याने केल्या होत्या. अशातच सोमवारी डीबीजे महाविद्यालयासमोर उड्डाणपुलावर पिलरसाठी टाकण्यात येत असलेली लोखंडी सळी अचानक खाली पडली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी अथर्व शिंदे याच्यावर पडली. यात त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले.