शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

संशयित महिलेशी सोशल मीडियावर ओळख, गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने गुंतवणूक; रत्नागिरीतील एकाची साडेअकरा लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:51 IST

कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष

रत्नागिरी : गोल्ड ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील एकाची तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या फसवणुकीप्रकरणी मारिया (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) आणि TRADNGBED कंपनीच्या सर्व अकाउंट होल्डरांवर रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार ४ जुलै २०२५ ते २१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत झाला आहे. फिर्यादीची दिशाभूल करून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तसेच गुंतवणुकीचा लाभ न देता मूळ गुंतवणुकीच्या रकमेची फिर्यादीने विचारणा केल्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे ६ लाख १३ हजार ६४७ रुपये इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागेल आणि मनी लॉड्रिंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेक्टेड झाल्यामुळे सर्व रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने पैसे भरूनही त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर कोणताही लाभांश न मिळाल्याने तब्बल ११ लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फिर्यादीने शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर ओळखफिर्यादीची संशयित महिला मारिया हिच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. तिने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपण ट्रेडिंग संदर्भातील सल्लागार असल्याचे भासवले. त्यानंतर गोल्ड ट्रेडिंग करुन कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून तिने फिर्यादीला व्हॉटसॲपद्वारे लिंक पाठविली. त्यानंतर पैसे घेऊन फसवणूक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Man Duped of ₹11.5 Lakh in Gold Trading Scam

Web Summary : A Ratnagiri resident lost ₹11.5 lakh to a gold trading scam after being lured by high returns on social media. The victim was persuaded to invest via WhatsApp, then defrauded under the guise of company rules and money laundering concerns. Police have registered a case against the suspects.