शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
2
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
3
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
4
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
5
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
6
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
7
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
8
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
9
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
10
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
11
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
12
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
13
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
14
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
15
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
16
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
18
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
19
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

Ratnagiri: गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन निघाले, आगीत जळून खाक झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:42 IST

साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले

हर्षल शिरोडकरखेड : गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्यासह अन्य साहित्य घेऊन मुंबईतून मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील काेकणवासीय खासगी आराम बसने निघाले हाेते. मात्र, काेकणच्या हद्दीत येण्यापूर्वीच कशेडी घाटात आराम बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. रविवारी सकाळी आग शांत झाल्यानंतर काहींनी आगीत काही साहित्य वाचले का, हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण, काेणाच्याच हाती काही लागले नाही. साहित्याचे जळलेले अवशेष पाहून मात्र अनेकांच्या डाेळ्यांत अश्रू दाटले हाेते.कोकणात गणेशोत्सव म्हटलं की, मुंबईत नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले गणेशभक्त आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात. मुंबईतून गावी येताना गणेशोत्सवात सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य, नातलगांसाठी नवीन कपडे, प्रसाद, विजेची तोरणे यासह विविध साहित्य साेबत घेऊन येतात.कुटुंबासहित प्रवास करणाऱ्या या मुंबईकरांनी उत्सवामुळे मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूही सोबत घेतलेल्या असतात. मालवणकडे निघालेल्या मुंबईकरांनीही आपल्यासाेबत उत्सवासाठी माेठ्या प्रमाणात साहित्य घेतले हाेते. बसच्या मागील डिकीत प्रवाशांनी बॅगा ठेवलेल्या हाेत्या. मात्र, शनिवारी मध्यरात्री बसला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून गेले.रविवारी सकाळी ही आग शांत झाल्यानंतर काही प्रवाशांनी बसमध्ये आगीतून काही साहित्य वाचले आहे का, याचा शाेध घेतला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. जळलेल्या साहित्यांचे अवशेष पाहिल्यानंतर त्यांचे अश्रू दाटून आले आणि गहिवरलेल्या अवस्थेत ते खाली उतरले.

आनंदावर विरजणसिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः पाच दिवस गणेशाची आराधना करणाऱ्या कुटुंबात सर्वसाधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने कुटुंबातील स्त्रिया विविध प्रकारचे दागदागिने परिधान करतात. मुंबईतून आपल्या गावी येणारे कुटुंब आपले वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाने मिळवलेले मौल्यवान दागिने सोबत घेऊन येतात. मात्र, हे माैल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी