Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 16:58 IST2025-08-26T16:54:18+5:302025-08-26T16:58:41+5:30
मृत बिबट्या वन विभागाच्या ताब्यात

Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ
चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथे आज, मंगळवारी (दि.२६) सकाळी बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळला. ही घटना अमोल साळुंखे यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये घडली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत साळुंखे यांनी तत्काळ शिरगाव पोलिस ठाणे व वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार चिपळूण वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात मोठा बिबट्या आणि बछड्यात झालेल्या भांडणात बछड्याच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. मृत बिबट्या नर जातीचा असून त्याला चिपळूण येथे नेण्यात आले आहे.