शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लोटेतील मोर्चाप्रकरणी सुमारे ४५० जणांवर गुन्हा दाखल, कशासाठी काढला होता मोर्चा.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:00 IST

असगणी ग्रामस्थांनी तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता

खेड : तालुक्यातील असगणी येथील अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या हिंदुस्तान कोकाकोला कंपनीमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने असगणी ग्रामस्थांनी गुरुवारी (५ जून) तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला होता. या प्रकरणी मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासिन फरीक घारे यांच्यासह सुमारे ४५० जणांवर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुवींद्र रामचंद्र धाडवे, शाहीन इस्माईल कादरी, रिया सचिन बाईत, मेघना भाऊ नायनाक, चेतन चंद्रकांत पवार, संजय सखाराम बुरटे, अनंत विठ्ठल नायनाक, इस्माइल हसन कादरी, हुसेन करीम ठाकुर, विवेक वासुदेव नायनाक, जावेद जब्बार आंबेडकर, रवींद्र सखाराम बुरटे, रविना रवींद्र बाईत, श्रीकांत आत्माराम फडकले, संजय आंब्रे, उस्मान हसन झगडे, गंगाराम धोंडू इप्ते, संजय तुळशीराम मोहिते यांचा समावेश आहे.

मोर्चा कशासाठी होता?ग्रामस्थांच्या रोजगाराबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी आणि उपसरपंचांसह काही जणांवर केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारी