शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय राजवटीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला ६० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:10 IST

रत्नागिरी : मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांवर गेली दोन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे या संस्थांना ...

रत्नागिरी : मुदत संपलेल्या जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांवर गेली दोन वर्षे प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे या संस्थांना दरवर्षी मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा निधी रोखण्यात आला आहे. रत्नागिरीजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक असल्याने गेल्या तीन वर्षांतील बंधित  आणि अबंधित निधी न मिळाल्याने जिल्ह्याला ६० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाच्या  मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा आधार घेऊन बंधित आणि अबंधित या दोन प्रकारांत निधी दिला जातो. त्यात मूलभूत सुविधांची कामे अबंधित  निधीतून व पाणी पुरवठा, तसेच स्वच्छतेसंबंधीची कामे बंधित निधीतून केली जातात.  जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणाऱ्या निधीतून ८० टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यात थेट वर्ग केली जाते.उर्वरित प्रत्येकी १० टक्के रक्कम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. मात्र, प्रशासकीय राजवट असलेल्या पंचायतराज संस्थांना हा निधी न देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रशासकराज असलेली रत्नागिरी जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांना गेल्या तीन वर्षांपासून दमडीही मिळालेली नाही. केंद्र शासनाच्या या भूमिकेमुळे  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमार्फत ग्रामपातळीवर केल्या जाणाऱ्या विकासकामांना मोठी खीळ बसली आहे.पंधराव्या वित्त आयोगातून रत्नागिरी जिल्हा परिषदेला दरवर्षी १० कोटी रुपये आणि नऊ पंचायत समित्यांसाठी मिळून १० कोटी असा दरवर्षी निधी येतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सन २०२२ पासून प्रशासकीय राजवट आहे.  त्यामुळे सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये  जिल्हा परिषदेचा ३० कोटी आणि पंचायत समित्यांचा ३० कोटी असा एकूण ६० कोटी निधी अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे सन २०२२-१३ पासूनचे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे विकास आराखडे रखडले आहेत.

ग्रामपंचायती सक्षम करणेस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासकामे करण्यासाठी केंद्र शासनाकडून  निधी देण्यात येतो. पूर्वी शासनाकडून मिळणारा हा निधी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला वर्ग करण्यात येत होता. त्याचबराेबर जिल्हा परिषदेलाही निधी मिळत होता. केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ लागला. थेट  निधी मिळाल्याने ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, असा उद्देश आहे.

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून होणारी कामे

  • गावांमध्ये पाणीपुरवठा
  • विद्युत पंप बसविणे
  • पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती
  • गावात सिमेंट काँक्रीटचे रस्ते
  • बंदिस्त गटार
  • आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना साहित्य पुरविणे
  • आरोग्य शिबिर घेणे
  • जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीला शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणे
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीfundsनिधी