दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर

By मनोज मुळ्ये | Updated: July 8, 2024 11:54 IST2024-07-08T11:52:46+5:302024-07-08T11:54:07+5:30

चार ते पाच तास ही मोहीम सुरू होती

56 people trapped in flood in Rajapur were pulled out | दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर

दिलासा! राजापुरात पुरात अडकलेल्या ५६ लोकांना काढले बाहेर

विनोद पवार

राजापूर : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून शहरातील ५६ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला. सोमवारी पहाटे पाणी ओसरले आहे.

तीन दिवस संततधार पडणा-या पावसामुळे रविवारी दुपारी चार वाजण्याच्य सुमारास राजापूर शहरात पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले. त्यानंतर ते वाढतच गेले. रात्री २ वाजेपर्यंत पुराच्या पाण्याची पातळी कायम होती.

पावसाचा आणि त्यामुळे पुराचा जोर वाढत असल्याने रात्री ११ वाजता पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी बोटीने फिरुन आढावा घेतला. त्यावेळी पाण्याने वेढलेल्या भागातील घरांमधील ५६ लोकांना त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी बोटीने सुरक्षित ठिकाणी आणले. चार ते पाच तास ही मोहीम सुरू होती. रात्री २ वाजल्यानंतर पूर ओसरु लागला. सकाळी आठ वाजता पाणी पूर्ण ओसरले हाेते. नदी आपल्या मूळ प्रवाहात वाहत होती.

Web Title: 56 people trapped in flood in Rajapur were pulled out