शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन अभियानांतर्गत ५४६ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: September 8, 2015 22:32 IST

कृषी अधीक्षक कार्यालय : अद्याप १९९ प्रस्ताव प्रलंबित

रत्नागिरी : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे विविध यांत्रिक अवजारांबरोबर शेततळे, हरितगृहे, पॅक हाऊस, तसेच प्रक्रिया उद्योग यांसारख्या विविध ५४६ प्रस्तावांना आॅगस्टअखेर मंजुरी देण्यात आली आहे, तर १९९ प्रस्ताव प्रलंबित आहेत.शेतीसाठी मजुरांची कमतरता भासत आहे शिवाय मजुरी वाढली असल्याने यंत्राचा वापर वाढला आहे. शिवाय बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे खर्च वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी विविध पिकांसाठी संशोधन करत आहेत.शासनाकडून यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५४६ विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे ७, फुले लागवडीचे २, पुनरूज्जीवन २, सामूहिक शेततळे ८, नियंत्रित शेती हरितगृह ३, मल्चींग ३, शेडनेट १, पिक संरक्षक उपकरणांमध्ये ग्रासकटर, स्पे्रअर पंपाचे १६२, फलोत्पादन यांत्रिकी ८ बीएचपी कमीचे ३८, तर जास्तचे ३७, २० बीएचपीच्या २४४ ट्रॅक्टर १ प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत पॅक हाऊसचे १९, प्रक्रिया उद्योग ५, वातानुकूलीत वाहन १ व अन्य ७ मिळून एकूण ५४६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मंडणगड तालुक्यात १५, दापोली ४७, खेड ४२, चिपळूण १४, गुहागर २१, संगमेश्वर २२, रत्नागिरी १५५, लांजा ८८, राजापूर तालुक्यातील १४२ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.आॅगस्टअखेर १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये क्षेत्रविस्तार केळी लागवडीचे २, फुले लागवड १, पुनरूज्जीवन १६, सामूहिक शेततळे २, शेडनेट २, पीक संरक्षण उपकरणे ३८, फलोत्पादन यांत्रिकीकरण ८ बीएचपी कमीचे २, जास्तचे १० व २० बीएचपीचे ९०, ट्रॅक्टर ३ प्रस्ताव प्रलंबित आहेत. काढणीपश्चात व्यवस्थापनांतर्गत एकात्मिक शीतसाखळीचे १ व अन्य ३२ मिळून १९९ प्रस्ताव प्रलंबित असून, लवकरच त्यांना मंजूरी देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.मंडणगड तालुक्यात ८, दापोली २२, खेड १०, चिपळूण ५, गुहागर ८, संगमेश्वर २०, रत्नागिरी १०१, लांजा २३, राजापूर तालुक्यातील २ मिळून १९९ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)