जिल्ह्यात ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:23 IST2021-05-31T04:23:49+5:302021-05-31T04:23:49+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ...

508 corona positive patients in the district; Another 14 victims | जिल्ह्यात ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी १४ बळी

जिल्ह्यात ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आणखी १४ बळी

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच २४ तासांत ५०८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ३६ हजार ४४ झाली आहे तर १४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून एकूण १,२१७ जणांचा मृत्यू झाला आहेत. ३७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्यांची संख्या ३१ हजार २८० झाली आहे.

जिल्ह्यात २,४७४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २९६ रुग्ण तर अँटिजेन चाचणीत २१२ रुग्ण सापडले. त्यामध्ये दापोली तालुक्यात १, खेडमध्ये १३, गुहागरात ३, चिपळुणात २७, संगमेश्वरमध्ये ४३, रत्नागिरीत ६२, लांजात १३ आणि राजापुरात सर्वांत जास्त ९० रुग्ण आढळले तर रविवारी मंडणगडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. रुग्ण पॉझिटिव्ह सापडण्याचे प्रमाण १७.६९ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना मृतांचा आकडा वाढतच चालला असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त १४ पैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला तर राजापूर, दापोली तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ जणांचा आणि खेड, संगमेश्वर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्ण मृत झाला आहे. कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण ३.३७ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७८ टक्के आहे.

Web Title: 508 corona positive patients in the district; Another 14 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.