शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

रत्नागिरी एमआयडीसी : हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू, नोव्हेंबर महिन्यातच घशाला कोरड

रत्नागिरी : रत्नागिरी शहर, मिरजोळेसह परिसरातील नऊ गावच्या नळयोजनांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात एमआयडीसीने ५० टक्के कपात केली आहे. हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा कामामुळे पंधरा दिवस पाणीकपात लागू राहणार असून, त्यानंतर पूर्ववत पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, या पाणीकपातीमुळे अवलंबून असलेल्या सर्वच गावांत नळयोजनांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जॅकवेलमधील गाळ उपसा करण्यास एवढे दिवस कशासाठी लागतात? असा सवाल आता जाणकारांमधून केला जात आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून हरचेरी येथील जॅकवेलचा गाळ उपसा करण्यात येतो. मात्र, गाळ उपसा करण्याच्या नावाखाली १५ दिवसांचा घेतला जाणारा अवधी हा अधिक आहे. जे काम आठवडाभराच्या आत होऊ शकते, त्यासाठी पंधरा दिवस कशासाठी, असाही सवाल जलव्यवस्थापनातील जाणकारांकडून केला जात आहे. धरणात पुरेसा पाणीसाठी असताना तांत्रिक कारणावरून १५ दिवस पाणीकपात करण्याची आवश्यकताच नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जॅकवेलमधील गाळ उपसा काम कशातऱ्हेने चालते, त्यासाठी पंधरा दिवसांचा घेतला जाणारा वेळ हा योग्य आहे की कमी दिवसात हे काम करता येईल, याची पाहणी व तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. याशिवाय ग्रामपंचायतींनीही स्वत:च्या क्षेत्रात पाण्याचे अन्य स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी पर्याय म्हणून बोअरवेल्स काढणेही आवश्यक आहे. भविष्यकालीन नियोजन हवेरत्नागिरी शहर व परिसरातील अनेक गावांचे शहरीकरण जोरात सुरू आहे. गावांचा विस्तार वाढत असताना अनेक अपार्टमेंट्स उभ्या राहात आहेत. त्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेने भविष्यकालीन अधिकच्या पाण्यासाठी बावनदीचे काही टक्के पाणी पालिकेसाठी राखीव करुन मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु भविष्यात रत्नागिरीसह हातखंब्यापर्यंतची गावे धरून मोठ्या शहराचा विचार होऊ शकतो. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ही मोठी गंभीर समस्या बनू पाहात आहे. त्यामुळे पालिका व सर्वच गावांनी एकत्र येऊन भविष्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आतापासूनच पाण्याच्या उद्भवांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या नदीवरून या संपूर्ण परिसरासाठी नळपाणी योजना आराखडा तयार करण्याचीही आवश्यकता आहे. गाळ उपसा चालणार३० नोव्हेंबरपर्यंतएमआयडीसीतर्फे एमआयडीसी मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, मिऱ्या, कर्ला, पोमेंडी खुर्द, कारवांचीवाडी, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग यांना मिळून दररोज ९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. सध्या गाळ उपसा सुरू असल्याने हा पुरवठा निम्मा म्हणजेच साडेचार एमएलडी एवढा केला जात आहे. १७ पासून सुरू झालेला हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा ३० पर्यंत चालणार आहे. धरणक्षेत्रात मुबलक पाणीएमआयडीसीने नळपाणी योजनांना केलेली पाणीकपात ही काही तांत्रिक कारणांमुळे (गाळ उपसा) आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे यंदाही हरचेरी, निवसर, असोडे, आंजणारी, घाटीवळे या धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने पाणी भरलेले आहे. १६.५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे जुलै २०१५ पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा असल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता बी. एन. पाटील यांनी दिली.अनेक ग्रामपंचायतीना फटका...एमआयडीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा सुरू.रत्नागिरी, मिरजोळे, कुवारबाव, शिरगाव, नाचणे, कर्ला गावांचा समावेश.गाळ उपसा कामाला १५ दिवस अनावश्यक, नागरिकांच्या प्रतिक्रिया.रत्नागिरी एम्आय्डीसीकडून हरचेरी जॅकवेलमधील गाळ उपसा काम सुरू आहे. या जॅकवेलमध्ये धरणक्षेत्रातील पाच ठिकाणी उभारलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमध्ये अडविलेले पाणी आणले जाते. त्यातीलच पहिल्या छायाचित्रात अंजणारी येथे व दुसऱ्या छायाचित्रात असोडे येथे अडविण्यात आलेला हा जलसाठा दिसत आहे.