५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 23:39 IST2023-01-22T23:38:15+5:302023-01-22T23:39:24+5:30
बुधवारी पहाटे गॕस गळती होऊन एसीचा कंडेन्सर आणि फ्रीजचा स्फोट झाला.

५ दिवसांची मृत्यूशी झूंज अपयशी, गॅस गळती स्फोटातील काझी यांचं निधन
रत्नागिरी : गॅस गळतीच्या स्फोटात गंभीर भाजलेल्या अशफाक काझी यांनी पाच दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली आणि रविवारी रात्री त्यांचा कोल्हापूर शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे गॅस गळती होऊन एसीचा कंडेन्सर आणि फ्रीजचा स्फोट झाला. त्यात अशफाक काझी व त्यांचा मुलगा अम्मार जखमी झाले, तर काझी यांची पत्नी कनिज व सासू नुरुन्निसा यांचा जागीच मृत्यू झाला. ८५ टक्के भाजलेल्या अशफाक यांना त्याच दिवशी कोल्हापूरला सीपीआरमध्ये हलवण्यात आले. मात्र पाच दिवसांची त्यांची झुंज अपयशी ठरली. रविवारी रात्री उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.